inner-banner

परिवहन व दळणवळण

श्री. म. महादेव

श्री. म. महादेव
प्रमुख,
परिवहन व दळणवळण

परिवहन व दळणवळण विभाग हा प्राधिकरणातील सर्वात जुना व महत्वाचा विभाग म्हणून नावारुपास आहे. मुंबई महानगर प्रदेशातील परिवहन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी परिवहन व दळणवळण विभाग कायम अग्रेसर असुन विभागामार्फत परिवहन विषयक पायाभूत प्रकल्पांचे नियोजन तसेच दिर्घकालीन आराखडा तयार करण्याचे काम प्रामुख्याने करण्यात येते.

विभागामार्फत सार्वजनिक जलद वाहतूक प्रणाली जसे की मेट्रो रेल्वे, मोनो रेल्वे, रस्ते, महामार्ग इत्यादीं सारखे मोठे प्रकल्प राबविण्यासाठी आवश्यक असे सुसाध्यता अहवाल व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येतात. मुंबई महानगर क्षेत्रातील विशेष नियोजन प्राधिकरण या नात्याने या क्षेत्रातील वाहतूक नियोजन आराखडा तसेच लघुकालीन व मध्यमकालीन उपाययोजना देखील या विभागामार्फत राबविण्यात येतात.

सदयस्थितीत विभागामार्फत नरीमन पॉईंट ते कुलाबा पुलाचे बांधकाम, फ्युनिक्युलर रेल्वे, एकात्मिक तिकिटीकरण पध्दत, बहूउद्देशिय पादचारी झुलता पुल, मेट्रो स्थानकांमध्ये बहुवाहतूक परिवहन एकत्रिकरण, रोड मार्किंग, ट्रफिक साईनेजस इत्यादीं सारख्या उपायांची अंमलबजावणी करण्यात येते.

परिवहन व दळणवळण विभाग शहरी परिवहन बाबतीत मुंबई महानगर प्रदेशातील विशेषज्ञ म्हणून विविध विभागांसमवेत समन्वय साधण्याचे काम सातत्याने करत आहे. त्याचप्रमाणे, वेळोवेळी राज्य शासन यांना परिवहन विषयी तांत्रिक सहाय्य करत असते.

मुंबई महानगर प्रदेश व परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिकाधिक सक्षम करणे आणि संबंधित सर्व संस्थांमध्ये समन्वय राखून वाहतूक विषयक आव्हानांचा एकत्रित व परस्पर पूरक योजना व उपक्रमाव्दारे मुकाबला करण्याचे काम परिवहन व दळणवळण विभाग हा एकीकृत मुंबई महानगर परिवहन प्राधिकरणास (UMMTA) सहाय्य करतो.

परिवहन व दळणवळण विभागाने हाती घेतलेले प्रकल्प / कामे खालीलप्रमाणे आहेतः

 १. सर्वंकष परिवहन अभ्यास अद्यावतीकरण.
 २.पश्चिम द्रुतगती महामार्गावर नियंत्रित प्रवेश व सिंग्नलविरहित वाहतूकीचा अभ्यास.
 ३. मुंबई मेट्रो बृहत आराखडा.
 ४. मेट्रो मार्ग - 1 वर्सोवा - अंधेरी - घाटकोपर विषयक कामे.
 ५. मेट्रो मार्ग - 8 (छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) (सविस्तर प्रकल्प अहवाल).
 ६.मेट्रो मार्ग - 13 (भाईंदर-विरार) (सविस्तर प्रकल्प अहवाल).
 ७. मेट्रो मार्ग - 14 (विक्रोळी-बदलापूर) (सविस्तर प्रकल्प अहवाल).
 ८. मेट्रो मार्ग - 5 ठाणे - भिवंडी - कल्याण (सविस्तर प्रकल्प अहवाल).
 ९. मोनोरेल (संत गाडगे महाराज चौक - वडाळा - चेंबूर).
 १०. इंटरस्टेट बस टर्मिनल, वडाळा.
 ११.मुंबई महानगर प्रदेशामध्ये एकात्मिक तिकीट प्रणाली.
 १२. शहरी हवाई रज्जू मार्ग (बोरीवली ते गोराई आणि मालाड ते मार्वे).
 १३.फ्युनिक्युलर रेल्वे.
 १४.पदचारी झुलता पुल (वांद्रे-कुर्ला संकुल (ई-ब्लॉक) ते महाराष्ट्र निसर्ग उद्यान).
 १५.मेट्रो स्थानकांमध्ये बहुवाहतूक परिवहन एकत्रिकरण (मेट्रो 2अ आणि मेट्रो 7).
 १६.वांद्रे-कुर्ला संकुलात स्वयंचलित जलद वाहतूक प्रणाली.
 १७.वडाळा डेपोचा वाणिज्यिक विकास.
 १८.एकिकृत मुंबई महानगर परिवहन प्राधिकरण.

You can reach through email at: श्री. म. महादेव, प्रमुख( अति. कार्यभार )
Transport & Communications : [email protected]

Transport Department

परिवहन आणि दळणवळण विभागाचे प्राथमिक कार्य एकूण परिवहन नियोजन, निवडक परिवहन पायाभूत सुविधा प्रकल्पांची रचना आणि अंमलबजावणी हे आहे. वाहतूक / वाहतूक क्षेत्रातील सर्वेक्षणे आणि अभ्यास, एमएमआरसाठी वाहतूक प्रभाव मूल्यांकन अभ्यास करणे आणि नगर विकास विभाग इत्यादीच्या निर्देशानुसार, वाहतूक संबंधित समस्यांवर सरकारला सल्ला देणे.

हा विभाग लहान प्रमाणात वाहतूक सुधारणा प्रस्तावाची अंमलबजावणी तसेच, जंक्शन सुधारणा, जंक्शनचे लँडस्केपिंग आणि सुशोभीकरण इत्यादी व मुंबई मेट्रो लाईन्सच्या मल्टीमोडल इंटिग्रेशन प्रस्तावांची अंमलबजावणी करण्याचे काम करतो.

चालू असलेल्या कामांची यादी :-

  • मेट्रो लाईन - 1 संबंधित कामे
  • मेट्रो लाईन- 5 एक्सेटेंन्शन- सविस्तर प्रकल्प अहवाल
  • ऑफ मेट्रो लाईन -8 फ्रॉम सीएसएमआयए एअरपोर्ट टू मानखूर्द सविस्तर प्रकल्प अहवाल
  • ऑफ मेट्रो लाईन- 13 मिरा भाईंदर टू विरार सविस्तर प्रकल्प अहवाल
  • ऑफ मेट्रो लाईन- 14 कांजुरमार्ग -बदलापूर सविस्तर प्रकल्प अहवाल
  • नरिमन पॉईंट टू कुलाबा ब्रिज
  • एमटीएचएल डिस्पर्सल ॲण्ड वरळी- शिवडी डिस्पर्सल
  • बांद्रा – कुर्ला कॉम्पेक्स पादचारी ब्रिज
  • मेट्रो लाईन- 7 स्टेशन्स एफओबीज
  • बांद्रा -कुर्ला कॉम्पेक्स वाहतूक चिन्हे / दिशादर्शक चिन्हे
  • बांद्रा -कुर्ला कॉम्पेक्स वाहतूक चिन्हे / दिशादर्शक चिन्हे
  • वडाळा ॲण्ड ओशिवारा वाहतूक चिन्हे / दिशादर्शक चिन्हे
  • वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सायकल टॅ्रक
  • मल्टिमोडल इंटिग्रेशन मेट्रो लाइन -2ए ॲण्ड 7
  • मल्टिमोडल इंटिग्रेशन फॉर मेट्रो लाईन -4 ॲण्ड 4ए
  • मल्टिमोडल इंटिग्रेशन फॉर मेट्रो लाईन- 7ए ॲण्ड 9 (11 स्टेशन्स)
  • मल्टिमोडल इंटिग्रेशन फॉर मेट्रो लाईन -2बी (20 स्टेशन्स)
  • मल्टिमोडल इंटिग्रेशन फॉर मेट्रो लाईन -6 (13 स्टेशन्स)
  • मल्टिमोडल इंटिग्रेशन फॉर मेट्रो लाईन- 5 (6 स्टेशन्स फेस – 1
  • माथेरान फ्युनिक्युलर रेल्वे
  • महावीर नगर मेट्रो स्टेशन-गोराई रोपवे कॉरीडॉर
  • बदलापूर रेल्वे स्टेशन एरिया ट्राफिक सुधारणा स्किम
  • मुंबई महानगर एकिकृत वाहतूक प्राधिकरण
  • ट्रान्सपोर्ट स्टॅटिस्टिक्स फॉर एमएमआर : बुक पब्लिकेशन
Transport & Communication
Sr. No. Title Download
1 मेट्रो फेस II अँण्ड III Download (33.93 KB)
Transport & Communication
Sr. No. Title Download
1 RTI द्वितीय अपील आदेश - शैलेश गांधी विरुद्ध MMOPL (दिनांक 19/3/2015) Download (2.52 MB)
2 परिवहन व दळणवळण विभागाची माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत सुधारित जन माहिती अधिकारी यादी सुची. Download (450.64 KB)
Transport & Communication
Sr. No. Title Download
1 मेट्रो लाईन 1 (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) Download (10.21 MB)
2 मेट्रो लाईन 2ए (दहिसर ते डी.एन.नगर) Download (13.39 MB)
3 मेट्रो लाईन 2 बी(डी.एन.नगर ते मंडाले) Download (31.76 MB)
4 मेट्रो लाईन 4 (वडाळा ते कासारवडवली) Download (47.99 MB)
5 मेट्रो लाईन 4 ए एक्सटेंन्शन ऑफ लाईन-4 फ्रॉम कासारवडवली ते गायमुख Download (12.7 MB)
6 मेट्रो लाईन 5 (ठाणे - भिवंडी - कल्याण) Download (15.36 MB)
7 मेट्रो लाईन 6 (स्वामी समर्थ नगर – जेव्हीएलआर- सीप्झ-कांजुरमार्ग-विक्रोळी (इइएच) Download (14.49 MB)
8 मेट्रो लाईन 7 (अंधेरी (पू) ते दहिसर(पू) Download (11.43 MB)
9 मेट्रो लाईन 7 ए ॲण्ड एएमपी/ 9 अंधेरी (पू) ते सीएसआयए ॲण्ड एएमपी/ दहिसर ते मिरा भाईंदर Download (15.71 MB)
10 मेट्रो लाईन 10- गायमुख ते शिवाजी चौक (मिरा रोड) Download (11.34 MB)
11 मेट्रो लाईन 11- वडाळा ते सीएसएमटी Download (14.4 MB)
12 मेट्रो लाईन 12 कल्याण ते तळोजा Download (14.07 MB)